नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. लोकांना घरात बसून रहा, असे फार काळ सांगता येणार नाही. असे वारंवार सांगितले तर, उद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भिती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. दिल्लीत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
उदयनराजे म्हणाले, कोरोनाचा कठीण काळ असला तरी घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रस्थानी ठेवूनच काम करत आलो आहे. पद नसताना समाजकारण केले. राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षात समाजाची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करणार आहे. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करीत राहिन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाविषयी बोलताना ते म्हणाले, कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. लोकांना घरात बसून रहा, असे फार काळ सांगता येणार नाही. असे वारंवार सांगितले तर, उद्या कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन हा प्रश्न ऐरणीवर येईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
‘आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त, पुन्हा एकदा दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’
दरम्यान, राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली. महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
‘एकीकडे महाराजांसारखी दाढी वाढवून त्यांची बरोबरी करायची अन् दुसरीकडे त्यांचा नावाला विरोध करायचा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

