🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिम्मित यशंवतराव चव्हाण सेंटर येथे बळीराजा कृतज्ञता दिन साजरा केला गेला. राज्यभरातील समर्थकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही शरद पवार यांच्याबद्दलच्या आठवणी जागवत शुभेच्छा दिल्या असून आभार व्यक्त केले आहेत.
यावेळी छगन भुजबळ यांनी एक जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणतात, ‘“शरद पवार साहेबांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच साहेबांचा गौरव केला. वाजपेयी साहेब म्हणायचे की, ‘पवार साहब इतने आगे है क्यूंकी उनके साथ प्रतिभा है!,” अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली.
खा.शरद पवार साहेबांची प्रतिभा आणि कार्य प्रचंड मोठे आहे. म्हणूनच माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी नेहमीच साहेबांचा गौरव केला. वाजपेयी साहेब म्हणायचे की पवार साहब इतने आगे है क्यूंकी उनके साथ प्रतिभा है! –@PawarSpeaks @NCPspeaks#SharadPawar
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 12, 2019
“पवार साहेब नेहमीच आपल्या सहकार्यांच्या पाठिशी उभे राहतात. माझ्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांनी सर्वतोपरी मदत केली. तेव्हा ते म्हणाले होते की, भुजबळ आपल्याला लढायचे आहे, घाबरायचे नाही. सर्व काही संपलं असं वाटत होतं तेव्हा साहेबांनी पुनर्जन्म दिला,” असं छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितलं.
आज सर्वच स्तरातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. सोबतच आज वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ८० लाख रुपयांचा विशेष निधी जमा करून तो धनादेश आज शरद पवारांना सोपविण्यात आला. या निधीचा वापर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वापरावा अशी सूचना शरद पवारांनी नेत्यांना केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205096656661708800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205101293242482688?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
