मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि अॅटमसाँगच्या माध्यमाने सर्वांची आवडती ठरलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. तिचा वाट बघतोय रिक्षावाला..हे गाणं आजही लोकप्रिय आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच सध्या ती चित्रपटापासून दूर असली तरीदेखील तिने तिच्या चाहत्यांना अंतर दिले नाही.
दरम्यान तिने बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला होता, ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा झाली. मात्र नंतर असा खुलासा आला की, एका शॉर्ट व्हिडिओसाठी हा गेटअप केला होता. अलीकडेच मानसीचा पतीसोबत एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की, तिचा पती प्रदीप खरेरा हे दोघेही अत्यंत साध्या वेशात दिसतात. तसेच मानसीच्या चेहऱ्यावर देखील खूप पिंपल्स आलेले दिसत आहेत. त्यानंतर ते दोघेही अत्यंत मॉर्डन लूकमध्ये आपली अदा दाखवितात. यामुळे चाहत्यांना मानसीबद्दल चिंता वाटून तिला काय झाले? असं वाटू लागले होत, मात्र हे केवळ व्हिडिओपुरता होता. दोघे ही काळ्या रंगाचा लायनिंगचा ड्रेस घातला आहे.
https://www.instagram.com/reel/CUwLEHSBLaS/?utm_medium=copy_link
हा व्हिडिओ शेअर करून त्याने ‘कैसा लगा’ असे कॅप्शन ही त्यावर दिले आहे. त्या दोघांचेही चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्याज जाणांना त्यांचा हा नवा लूक खूपच आवडला असून भरपूर लाईक आणि कमेंट येत आहेत. मानसीने एकता, कुटूंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त आदीं चित्रपटात अभिनय करून चाहत्यांची लाडकी बनली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- संतपीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणारा अभ्यासक्रम सुरू करा- उद्योग मंत्री


