🕒 1 min read
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची तब्येत खालावली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त एएनआयने दिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना ताप येत असल्याची माहिती आहे. यातून प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
२००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोनाची लागण झाली आहे. ते १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मनमोहन सिंग यांनी ४ मार्च आणि २ एप्रिल रोजी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.
Former Prime Minister Dr. Manmohan Singh admitted to All India Institute of Medical Sciences, Delhi
(file photo) pic.twitter.com/SAm5NOpeiF
— ANI (@ANI) October 13, 2021
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत आणि ते साखरेच्या आजारानेही त्रस्त आहेत. त्यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया १९९० मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर २००९ मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चीन-पाकिस्तानकडे लक्ष देण्याऐवजी ते खोटा इतिहास सांगताहेत’, नाना पटोलेंचा हल्लाबोल
- ‘काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते, त्यामुळे..’, ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे प्रत्युत्तर
- ‘..यामुळे वीर सावरकरांबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे’, फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया
- ‘महाविकास आघाडी सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे’, आदित्य ठाकरेंची ग्वाही
- ‘दुबईच्या गुन्हेगारालाही न घाबरणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचे रक्त आमच्या अंगात’, पंकजा यांनी राष्ट्रवादीला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

