🕒 1 min read
मुंबई : राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली असून त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे सरकारकडून एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.
या मदतीवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर केल्याबद्दल आभार मानतो. मविआ सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे असे ट्विट आदित्य यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, महसूल मंत्री @bb_thorat जी, सार्वजनिक बांधकाम मंत्री @AshokChavanINC जी यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर केल्याबद्दल आभार मानतो. मविआ सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. https://t.co/nL5qFEgQp0
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 13, 2021
जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात राज्यात पुरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ही मदत जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, तसेच ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळेना, शेतकऱ्यांच्या कॅनॉलमध्ये उड्या
- किती कोळसा हवा आहे हे विचारण्यासाठी आधीच केंद्राने राज्याला पत्र लिहिले होते – दानवे
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी पोलिसांनाच सामूहिक प्रयत्न करावे लागतील – वळसे पाटील
- ‘एकतर्फी प्रेमातून निघृण खून करणाऱ्या नराधमाचे वकील पत्र कोणीही घेऊ नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

