Share

चक्क दारूचे दुकानच उघडले घरात!

Published On: 

पुणे– गेले एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन आहे. जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवल्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून राज्यासह देशभरात लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे सर्वच उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद आहेत.

महाराष्ट्रात सुरुवातीपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तर पूर्ण राज्यात फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. यात भाजीपाला, औषधे, किराणा इत्यादीचा समावेश आहे. काही भागात तर अत्यावश्यक सेवा देखील मर्यादित कालावधीत चालू असतात. अशात मात्र व्यसनी माणसांची चांगलीच गैरसोय झाल्याची दिसून येत आहे. अगदी पान टपरी पासून ते दारू विक्रीला बंदी असल्याने हि दुकाने काटेकोरपणे बंद आहेत.

तरी सुद्धा मद्यपी हे काही ना काही उपद्व्याप करताना दिसत आहेत. जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या विक्रीला बंदी असताना घरातच दारू दुकान उघडून विक्री करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. विकास यमनाप्पा अक्काले याला २६ एप्रिल रोजी खराडी येथून जेरबंद केले आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक पूर्व पथकासह चंदननगर भागात पेट्रोलींग करत असताना तेथील एका राहत्या बंगल्यात विदेशी व्हिस्की, बियर, रम, वोडका अशा विविध ब्रँडचे विक्री करत असताना त्याला पकडले.

त्याच्याकडून त्यावेळी ५७ हजार ८६० रुपयाची दारू जप्त करण्यात आली होती. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) नुसार कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (पूर्व) पोलीस निरीक्षक विज टिकोळे यांनी हि कारवाई केली असून हे वृत्त पुढारीच्या माहिती नुसार समजते.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!