टीम महाराष्ट्र देशा: ज्यांना आपली आणि पत्नीचा सन्मान नाहीत, ते देशाचा सन्मान काय करणार, असं म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण उद्धट आणि लज्जास्पद असल्याचंही, बनर्जी म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे, यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागांसह देशभरातील ७२ जागांचा समावेश आहे, तत्पूर्वी रविवारी पूर्वी मिदानपूर जिल्ह्यात आयोजित सभेत ममता बनर्जी यांनी मोदींवर घणाघात केला आहे.
बनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर पहिल्यांदाच व्यक्तिगत टीका केली नसून याआधी देखील त्यांनी, पंतप्रधानांनी स्वत:च्या कुटुंबाची कधीच काळजी केली नाही? त्यामुळे आई, मुलगी आणि बहिण काय असते हे तुम्हाला काय कळणार, अशी टीका बनर्जी केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
