Share

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला

Published On: 

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर आणि विद्यमान सत्ताधारी गटाच्या सहकार बचाव पॅनेलमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.

तसेच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी अजित पवार समर्थकांचा निळकंठेश्वर पॅनल रिंगणात आहे. तर विद्यमान सत्ताधारी गटाकडून चंदरराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनल निवडणूक लढवत आहे. या दोन्ही पॅनलसह इतर 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत.

या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माळेगाव हा शरद पवार यांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. शरद पवार हे या कारखान्याचे सभासद आहेत. आतापर्यंत 1997 आणि 2015 च्या निवडणुका वगळता या कारखान्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे.

दरम्यान, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील ‘शेतकरी बचाव सहकारी पॅनेल’ ने एकूण एकवीस जागांपकी पंधरा जागेवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!