महाराष्ट्र देशा टीम : कोरोना व्हायरसच्या संकटातून बचाव करण्यासाठी जनजागृती आणि मदतीचा हात पुढे करताना अनेक बॉलीवूड कलाकार दिसत आहेत. नुकतेच अभिनेता जॉन अब्राहम याने पण सोशल मीडियाचा आधार घेत कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एक कविता त्याच्या ट्विटर अकाऊं वरून सादर केली आहे. तर याच कोरोना व्हायरसबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सलमान खानने नुकतंच त्याचं युट्युब चॅनल लॉन्च करत त्यावर स्वतःच्या आवाजातलं प्यार करोना हे पहिलं गाणं पोस्ट केलं होतं..अनेकांनी सलमानच्या या गाण्याला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर शाहरुखननेही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
आज शाहरुख खानने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन #AskSRK सेशन केलं. या दरम्यान त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यातील एका चाहत्याने शाहरुखला सलमानचं नुकतंच रिलीज झालेलं प्यार करोना गाणं पाहिलं का? असा प्रश्न विचारला त्यावर शाहरुख खानने एक मजेशीर उत्तर दिल. शाहरुखने लिहिलं, ‘भाई कमाल सिंगल आणि सिंगर आहे’.
Bhai kamaal ka Single aur Singer hai… https://t.co/iIvEaY1srk
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 20, 2020
‘प्यार करोना’ हे गाणं सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी मिळून लिहिलेलं आहे तर याला संगीत साजिद वाजिद यांनी दिलं आहे. सलमानने कोरोनो व्हायरसमुळे झालेल्या या लॉकडाऊनमध्ये घराबाहेर न पडता आपण आपला वेळ कोणकोणत्या प्रकारे योग्य मार्गी लावू शकतो हे स्वतःच्या आवाजात गाऊन सांगितलं आहे..यासोबतंच खासकरुन हा मिळालेला वेळ कुटुंबियांसोबत घालवण्याचा सल्लाही त्याने चाहत्यांना यातून दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

