Share

पुण्याने करून दाखवलं ! देशातील पहिला कोरोना टेस्टिंग कीट तयार, कमी वेळात होणार निदान

Published On: 

पुणे : पुण्यातून आनंदाची बातमी येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता स्वदेशी कीट तयार झाले आहे. विशेष म्हणजे याचे यशस्वी संशोधन झाले असून हे भारतीय बनावटीचे पहिले किट आहे. या कीटमुळे कमी वेळात कोरोना चाचणी होणं शक्य होणारं आहे. हा कीट चाचणीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.

कोरोनाच्या चाचणीसाठी RTPCR करणं गरजेचं असतं. दरम्यान NIV पुण्याने कोरोनासाठी एंटीबॉडी IgG Elisa टेस्ट कीट तयार केलं आहे. कोविड कवच एलिसा टेस्ट असे नाव याला देण्यात आलंय. मोठी लोकसंख्या असलेल्या वस्तीत हा कीट महत्वाची कामगिरी बजावणार आहे.

दाटीवाटीच्या वस्तीत कोरोना रुग्ण शोधून काढणं यामुळे सोपं होईल. मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी या कीटची चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली. अवघ्या अडीच तासांमध्ये ९० सॅम्पल टेस्ट करणं यामुळे शक्य होणार आहे. DCGI ने याच्या कमर्शिअल प्रोडक्शनसाठी zydus cadila कंपनीला परवानगी दिली आहे.

कसे काम करणार IgG Elisa टेस्ट कीट ?

एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारच्या व्हायरसची लागण झाली असेल तर त्याच्या शरीरातील त्या विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी एंटीबॉडीज तयार होतात. शरीरात एंटीबॉडीज शोधण्यासाठी रॅपिट टेस्टची आवश्यक असते. एंटीबॉडीज टेस्टसाठी कमी वेळ लागतो. तर कोरोना चौकशीसाठी आरटीपीसीआर रिपोर्टसाठी कमीत कमी २४ तास लागतात. एंटीबॉडीज टेस्टसाठी १ किंवा २ थेंब रक्त घेतलं जातं. व्हायरसला शरीरातून निकामी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीने एंटीबॉडीज बनवावे की नाही ? हे यातून समोर येते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!