Share

‘कोरोनाविरोधात लढण्यासाठी शासनाकडून निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही’

Published On: 

मुंबई : ‘करोनाशी लढण्यासाठी शासनस्तरावरुन स्थानिक यंत्रणांना सर्व प्रकारची मदत होत आहे. जिल्ह्यात एक हजार करोना विषाणू चाचणी संचाची उपलब्धता आहे. कमतरता भासल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी आणखी १५०० संचाचे नियोजन झाले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात येत आहे,’ अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्तार मंगळवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘करोनाविरोधात लढण्यासाठी शासनाकडून निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘करोनाबाधिताचा मृतदेह नेण्यासाठी सर्व सोयीयुक्त एक रुग्णवाहिका हिरे महाविद्यालयाला देण्यात येईल. करोना रुग्णांना सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही उपचार देण्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच त्याचा निर्णय येईल,’ असं सत्तार म्हणाले.

दरम्यान, ‘रेशन वाटपासंदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याच्या पुरवठा विभागाला सूचना केल्या आहेत. सर्वच केशरी कार्ड धारकांनाही स्वस्त धान्य उपलब्ध करुन देण्यात येईल,’ अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!