टीम महाराष्ट्र देशा : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल (त. ४) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिल्या.
तसेच यासाठी प्रत्येक महापालिका, नगरपालिका काय करू शकते याचा आराखडा येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना ते आदित्य ठाकरे म्हणाले, की राज्य शासनाने प्लास्टिक बंदीत लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मोहीमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थी, महाविद्यालये, एनएसएस, स्काऊटस् ऍन्ड गाईड स्स्पोर्टस् क्लब, हाऊसिंग सोसायट्या, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनजीओ अशा विविध संस्थांचा सहभाग घेऊन याला लोकचळवळीचे स्वरुप देण्यात यावे. प्लास्टिकचे घातक परिणाम लोकांना समजावून सांगावे.
त्याचप्रमाणे या सर्व आराखड्यांचा सर्वकष विचार करून संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल. यासाठी 1 मार्चला राज्यस्तरिय परिषद किंवा बैठक घेवून मार्च आणि एप्रिलमध्ये राज्यभरात मोठी जनजागृती मोहीम तसेच प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून 1 मे पूर्वी संपूर्ण राज्य सिंगल यूज प्लास्टिकमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी केल्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

