🕒 1 min read
मुंबई : भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. आज (27 जून) सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 21 पैसे महागलं आहे. मागील 21 दिवसात डिझेल 11 रुपये आणि पेट्रोल 9.12 रुपयांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 80.38 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80.40 रुपयांवर पोहोचलं आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा – आरोग्य मंत्री राजेश टोपे
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड वाढत्या इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारला तसंच पेट्रोल डिझेल महागाऊनर मौन बाळगणाऱ्यांना चिमटे काढत आहेत. आज ट्विटरवर असाच एक फोटो शेअर करत आव्हाडांनी पंतप्रधान मोदींना जोरदार चिमटा काढला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पेट्रोलपंपाजवळ एक फ्लेक्स लागलेलं दिसून येतं आहे. त्या फ्लेक्सवर नरेंद्र मोदींचा फोटो असून त्यावर अक्कड बक्कड बंबे बो…. 80, 90 पूरे 100… असं लिहिलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी वेगळ्या प्रकारे इंधन दरवाढीचा निषेध केला आहे.
सलून, केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करताना ‘या’ अटींचे पालन करावे लागणार
घर बसल्या पैसे कमवा… संध्याकाळनंतर पेट्रोल डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका… आत्मनिर्भर व्हा, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गुरूवारी आव्हाडांनी अक्षय कुमारचं जुनं ट्विट शोधून काढत इंधन टरवाढीवरून त्याला टोमणा मारला होता तर शुक्रवारी म्हणजे काल महानायक अमिताभ बच्चन यांना आव्हाडांनी चिमटा काढला होता.
घर बसल्या पैसे कमवा…..
संध्याकळनंतर पेट्रोल डिझेल विकत घ्या आणि सकाळी विका … #आत्मनिर्भर व्हा pic.twitter.com/2oM6Mxs08D— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
