पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
दफनभूमीची क्षमता संपूनही मुंब्र्यातील मंत्री गप्प का? निरंजन डावखरे यांचा आव्हाडांवर निशाणा
बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आमदार शरद रणपिसे, आमदार चेतन तुपे, आमदार भिमराव तापकीर, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार सिद्धार्थ शिरोळे हे लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीए चे आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य सेवा व अभियान विभागाचे संचालक डॉ.अनुप कुमार यादव, शासनाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या सह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी लोकप्रतिनिधींना नियमित संपर्क करावा. तसेच अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवावे, अशा सूचनाही श्री. पवार यांनी दिल्या.
‘गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने बहुजन समाजाचा अभिमान व स्वाभीमान वाढला’
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाच्या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोमेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी समन्वयाने काम केल्यास आपण कोरोनाची लढाई निश्चितपणे जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
