Share

मास्क आणि हँण्ड वॉश रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करून द्या : चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : ”कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्ण आढळून आली आहे. तर लोकांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि हँण्ड वॉश हे सर्वसामान्य व्यक्तींना घेणे परवडणारे नाही. त्यामुळे किमान रेशन घेणाऱ्या कुटुंबांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध दिले जावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली आहे.

 

दरम्यान, चीन उगमस्थान असलेल्या कोरोना व्हायरसने आता हळूहळू भारतातही शिरकाव केला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 11 वर पोहोचली आहे. भारतातही कोरोनाचा धोका देशात वाढत असून आता त्यामुळे परिस्थतीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तसेच, पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून मंगळवारी पाच असणारी कोरोना ग्रास्तांची संख्या आता आठवर पोहचला आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण 11 व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!