Share

मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान,निलंगा तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

Published On: 

🕒 1 min read

निलंगा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात पावसाने रौद्र रुप धारण केल्याने अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने निलंगा तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे मोठे सावट ओढवल्याने बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे.मंगळवार संध्याकाळपासून बुधवारी सकाळी ८ वा. पर्यंत तालुक्यातील दहाही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

दहा पैकी सात मंडळामध्ये तर १०० मिमी.पेक्षा जास्त तर उर्वरीत तीन महसूल मंडळामध्ये ६५ मिमी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.बुधवार सकाळ पासून मागील २४ तालुक्यात सरासरी १३१ मिमी.पावसाची नोंद झाली आहे.बुधवार सकाळ पर्यंत तालुक्यात आजतागायत ९९६ मिमी.एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी.आहे.त्यामुळे सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला असून बुधवारच्या या अतिवृष्टीने तर तालुका जलमय झाला असून तालुक्यातील सर्व लहान मोठे बंधारे व तलाव तुडूंब भरुन वाहत आहेत.

पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक दुष्टचक्रात सापडला आहे.तालुक्यातून वाहणा-या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्या दुथडीभरुन वाहत असल्याने नदीकाठच्या शेतक-यांच्या सोयाबीनच्या बनिमी वाहून गेल्याने शेतक-यावर मोठे आर्थिक संकट आल्याचे लिंबाळा येथील नदीकाठचे शेतकरी राजपाल पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सोयाबीन बरोबरच ऊसाचे पीकही आडवे पडल्याने ऊसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.तालुक्यात बुधवारी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले.नुकसानीचा अंदाज आज बांधणे शक्य नाही.पाऊस थांबल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.लिंबाळा येथील तेरणा नदीवर पूलावरीन ४-५ फूट पाणी वाहत असल्याने निलंगा-उमरगा वाहतूक बंद असून संपर्क तुटल्याचे तहसीलदार जाधव यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!