Share

राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे : चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पाटील ठाकरे सरकारच्या कारभरावर नेहमीच ताशेरे ओढत असतात. १०५ जागा येवून देखील विरोधी पक्षामध्ये बसावे लागल्याने चंद्रकांत पाटील सध्या महाविकास आघाडीवर सातत्याने आपला रोष व्यक्त करत आहेत. आज ते भोसरी येथे जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्ला चढवला आहे.

‘महाविकास आघाडी सरकारमुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या शोधून आंदोलने करायला हवेत. आज या घडीला राज्याच्या वसतीगृहातील अवस्था भीषण आहे. वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यात येतात मात्र त्यातही सावळा गोंधळ सुरू आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही जणांनी सरकारी नोकऱ्यांचा लाभ मिळवला आहे. पण सरकारला या सर्व विषयांबद्दल काही एक देणेघेणे पडलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे’, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ठाकरे सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पण राज्य सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कायमच कानाडोळा केला आहे.असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!