टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांनी यासाठी राज्यपालांची भेट घेतली आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं की, जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळदेखील यावेळी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की, जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे.
राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा या लढ्यात सहभागी झाली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा मा. राज्यपालांना विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्रीमंडळ ठराव पत्र आम्ही सुपूर्द केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी यासंबंधी ट्विट करत म्हटलं होतं की, “सद्यस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीनं कार्यवाही करावी,या विनंतीचा पुनरुच्चार केला”.
सद्यस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीनं कार्यवाही करावी,या विनंतीचा पुनरुच्चार केला. pic.twitter.com/bl0GRrlUJ3
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 27, 2020
राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधात लढा देत आहे. आमच्या सर्वांसह संपूर्ण यंत्रणा या लढ्यात सहभागी झाली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज पुन्हा मा. राज्यपालांना विधान परिषदेच्या जागेबाबत मंत्रीमंडळ ठराव पत्र आम्ही सुपूर्द केले. @BSKoshyari
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 28, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

