Share

महविकास आघाडीने केला फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय रद्द!

Published On: 

मुंबई: भाजपासोबतच्या महायुती मधून बाहेर पडत शिवसेनेनं सर्वांनाच धक्का दिला होता. तर, यानंतर आकड्यांची जमवा-जमव करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून महविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. यानंतर मागील ५ वर्षात फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर महविकास आघाडीने स्थगिती आणली. आता आणखी एक महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केल्याचे समजत आहे.

आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना पेन्शन देणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आणीबाणीच्या काळात आणीबाणीविरोधात आंदोलन करून तुरुंगवास भोगलेल्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने दरमहा पेन्शन लागू केली होती. मात्र महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून ही पेन्शन बंद केली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय झाला तेव्हा सद्या मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेचा देखील फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभाग होता.

दीर्घकालीन लॉकडाऊन योग्य नाही: नितीन गडकरी

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन दिली जाते. त्याच धर्तीवर आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना फडणवीस पेन्शन सुरू केली होती. त्यानुसार एक महिना तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार रूपये तर त्यापेक्षा कमी तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा ५ हजार रूपये पेन्शन देण्यात येत होती. यासंदर्भात झी २४ तासने वृत्त दिले आहे.

राज्यात २१ लाखांहून अधिक झाल्या कोरोना चाचण्या – राजेश टोपे

१९७५ ते १९७७ च्या काळात २१ महिन्यांसाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा जास्त समावेश होता. त्यामुळे भाजपा सरकारने सत्तेत येताच आणीबाणी काळात १ महिना व त्यापेक्षा कमी कालावधीसाठी बंदीवास सोसलेल्या व्यक्ती व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला.

देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत पण त्यांना नवरीच मिळेना – प्रकाश आंबेडकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!