मुंबई: फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगातच कोरोना विषाणूचे संकट कायम आहे. पण तरीही लॉकडाऊन हा त्यावर उपाय नाही. कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, दीर्घकालीन लॉकडाऊन योग्य नाही. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्यासाठी सकारात्मक आणि आत्मविश्वास सगळीकडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं.
“लॉकडाउन वाढवला गेला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट येतील. कोरोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून उद्योग सुरु करावेच लागतील. संपूर्ण लॉकडाउन योग्य नाही,” असंही नितीन गडकरींनी सांगितलं. कोरोनाचं संकट जगावर आहे. मात्र लॉकडाउन करणे हा एकमेव उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत करणं हे आव्हान आपल्याला पेलावचं लागणार आहे असं नितीन गडकरींनी सांगितलं.
राज्यात २१ लाखांहून अधिक झाल्या कोरोना चाचण्या – राजेश टोपे
तसेच, गडकरी यांनी मान्य केले की, कोरोनाव्हायरसमुळे राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक पेचप्रसंगाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि केंद्राचा महसूलही कमी झाला आहे. ते पुढे म्हणाले की दीर्घकाळ लॉकडाऊन कोविड -१९ साथीच्या रोगापेक्षा गंभीर संकट निर्माण करेल. हे आपले वैयक्तिक मत आहे, असे सांगून ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे होणारा नफा आणि तोटा यावर प्रश्न विचारणे योग्य नाही.
देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत पण त्यांना नवरीच मिळेना – प्रकाश आंबेडकर
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, ‘ भूकबळी आणि इतर आजारामुळे लोक मरत आहेत. हे लॉकडाऊन चक्रामध्ये दोन्ही शासन स्वतःहून अडकलेत. बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना दिसत नाही. सर्वसामान्य जनतेनेच शासनाला रास्ता दाखवण्याची गरज आहे. 3 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करा असं आवाहन केलं होत.
धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमवला; अजितदादांना भावना अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

