Share

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; ‘हा’ ठरला नवा मुहूर्त

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी अंतिम न झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती.

तसेच 23 किंवा 24 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. 27 किंवा 30 डिसेंबरला हा मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या मंत्र्याच्या यादीचा घोळ अद्याप सुरू आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. परंतु, केवळ अशोक चव्हाण यांचाच मंत्रिमंडळात समावेश होणार असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1209300308272115712?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209113040358035457?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!