टीम महाराष्ट्र देशा : जागतिक मंदीचे परिणाम देशावर होऊ नये यासाठी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल करून कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधिची घोषणा खुद्द देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे देशात बाहेरील कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्यासाठी सवलत मिळणार आहे. तसेच अंतरराष्ट्रीय ट्रेड वॉरचा फायदा भारताला मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राला ही मोठा फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या आर्थिक निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला कशा पद्धतीने होणार आहे, हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी फडणवीस म्हणाले की, कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय महत्वाचा आहे. अमेरिकेत आणि चीनमध्ये चाललेल्या ट्रेड वॉरमुळे ज्या कंपनी स्थलांतरित होत आहेत. त्या भारतात येण्याची शक्यता आहे. मात्र या कंपन्या भारतात येण्यासाठी 30 टक्के कॉर्पोरेट टॅक्सचा अडसर होता तो दूर झाला. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करणे गरजेचे आहे असं अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात. भारताने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, असे फडणवीस म्हणाले.
तसेच कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे. देशाचं मॅन्युफॅक्चरिंग हब महाराष्ट्रात आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचा फायदा सर्वाधिक जास्त महाराष्ट्राला होणार आहे. महाराष्ट्रात अनेक जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. तसेच टॅक्स कमी झाल्यामुळे वाचलेले पैसे पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
नवीन गुंतवणुकीला 15 टक्के कॉर्पोरेट टॅक्सचा लावण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. या निर्णयामुळे उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निर्माण होणार आहे. नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने गुंतवणुकीचा निर्णय असो वा बँकांचे विलीनीकरण असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले. रेपो रेट कमी करण्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176028552333934592?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176029900571955200?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176031358855991296?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176034948911775744?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

