🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : बुधवारी (22जानेवारी) खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. आसाममधील गुवाहाटी येथे 9 जानेवारीपासून सुरु असलेल्या या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राच्या या उत्तम कामिगीरीमुळे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल ठरला आहे. ही बाब महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने अभिमानाची आहे. अशीच कामगिरी यापुढेही खेळाडूंनी करावी यासाठी युवक कल्याण विभागाच्या वतीने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता विविध उपक्रम आणि सुविधा पुरविण्यात येतील. असे मंत्री केदार यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण 78 सुवर्णांसह 256 पदके जिंकली आहेत. 13 दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने 78 सुवर्ण, 77 रौप्य आणि 101 कांस्यपदकांसह सलग दुसरी खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा जिंकली. हरियाणा 200 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दिल्लीने 122 पदकांसह तिसरे स्थान पटकावले आहे.
दरम्यान अनेक जलतरणपटूंनी सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे. यात जलतरणपटू करीना शंकता हिचे नाव अव्वलस्थानी येते. तिने दुसरे सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राला जलतरण स्पर्धेत 18 सुवर्णांसह एकूण 46 पदकं मिळवून दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
