Share

भाजपाच्या दूध आंदोलनावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे गंभीर आरोप

Published On: 

मुंबई: भाजपा महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहे. उद्यापासून भाजपा दूध दरवाढीसाठी आंदोलन करणार आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसने गंभीर आरोप करत या आंदोलनावर टीका केली आहे. ‘ महाराष्ट्रद्रोह’ करण्यापेक्षा मोदींकडे राज्यासाठी मदत मागा, अश्या खोचक शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सल्ला दिला आहे.

त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट व व्हिडिओ शेअर करत हि टीका केली आहे. ते ट्विट मध्ये म्हणतात, ‘कोरोनाच्या कठीण संकटात सरकारला मदत करण्याऐवजी अडचणी वाढवण्यात भाजपा नेत्यांना रस आहे. असा ‘महाराष्ट्र द्रोह’ करण्यापेक्षा मोदींकडे राज्यासाठी आर्थिक मदत मागा. भाजपाचे सरकार असताना दुध उत्पादक शेतकऱ्यांची काय दुरावस्था केली होती हे महाराष्ट्र जाणतो. भाजपाचा जाहीर निषेध!’

कोल्हापुरातील लॉकडाऊनच्या नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम

भाजपने दुध दरवाढीसाठी १ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली होती. पण पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दुधाच्या प्रश्नावर २१ जुलै रोजी बैठक बोलावल्यामुळे नंतर आंदोलन करण्यास मुद्दा राहणार नाही म्हणून भाजपा लगबगीने सोमवारी आंदोलन करत आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

मोठी बातमी : रुपाली चाकणकर यांची प्रकृती अस्वस्थ, पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल

तसेच, भाजपा किती खालच्या पातळीवर उतरणार आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा असंतोष निर्माण करुन गलिच्छ राजकारण करणे हाच उद्देश आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. तर, दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रुपये अनुदान थेट त्यांच्या बँकेत जमा करावे. दुध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो ५० रुपये अनुदान, गायीच्या दुधाला ३० रुपये दर द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.

माझी मैत्रिण लवकरात लवकर बरी होवो हीच परमेश्वराकडे प्रार्थना – चित्रा वाघ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!