टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व उद्योग आणि व्यवसाय बंद करण्यात आले आहे. या बंदीत अकाल पासून काही उद्योगांना सशर्त सूट देण्यात आली असली तरी देशातील बहुतांश व्यवसाय बंद आहेत.
लॉक डाऊन काळात वाहतूक साखळी पूर्ण विस्कळीत झाली असून याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतातीत तयार फळे भाजीपाला ग्राहकापर्यंत पोहचू शकत नसल्याने शेतकर्याचा माल शेतातच खराब झाला आहे. शेतीतील फळे आणि भाजीपाला या नाशवंत पिकांच उत्पादन घेणारे शेतकरी त्यामुळे अडचणीत आले आहेत.
तसेच गेल्या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी वाढली पावसानेही शेतकर्यांच्या अडचणीत अधिकच वाढ केली आहे. आत याच पार्श्वभूमीवर शेतकर्यांना काही दिलासा देता यावा यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या उप-समितीची बैठक घेण्य्यात आली.
या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , जलसंपदा मंत्री जयंत पाटील , कृषिमंत्री दादा भुसे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम हे उपस्थित होते. याबाबतची माहिती जयंत पाटील यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
‘प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री दादा भुसे , मंत्री राजेश टोपे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री विश्वजीत कदम ही उपस्थित होते.’
प्रधानमंत्री पीक विमा योजना व फळपीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री @dadabhuse, मंत्री @rajeshtope11, मंत्री @bb_thorat, मंत्री @vishwajeetkadam ही उपस्थित होते. #WarAgainstVirus #CoronaWillEndSoon pic.twitter.com/hTyxQobFqL
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 21, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

