Share

मराठी पाऊल पडते पुढे : राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादीत महाराष्ट्र अग्रेसर

Published On: 

नवी दिल्ली : केंद्राच्या राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य ठरलं आहे. राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांनी जनतेला प्राथमिक ऊर्जा पुरविण्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आठ राज्यांची ही यादी तयार करण्यात आली आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते ही यादी प्रसिद्ध करण्यात आली.

प्रवासी भारतीय भवनमध्ये आयोजित केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने मंत्रालयाच्या विविध योजना व कार्यक्रमांच्या आढावा बैठकीत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांच्या हस्ते आज ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी 2019 प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत देशातील 8 अग्रेसर राज्य व केंद्र शासीत प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

केंद्रीय ऊर्जा , नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने घालून दिलेल्या महत्त्वपूर्ण 97 मानकांच्या आधारे ऊर्जा कार्यक्षमतेबाबत देशातील 36 राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांनी केलेल्या उपायोजनांचा अभ्यास करून राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी तयार करण्यात आली आहे. अलायंस फॉर इफिसीयंट इकोनॉमी आणि ऊर्जा दक्षता ब्युरो या संस्थांनी राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी -2019 तयार केली आहे.

राज्यात ऊर्जा बचत आणि उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून केलेल्या कार्यक्षम वापराची दखल या यादीत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पुडुचेरी आणि चंडीगड या राज्य व केंद्रशासीत प्रदेशांचा या यादीत समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!