🕒 1 min read
पुणे : यंदाची 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2 ते 7 जानेवारीदरम्यान म्हाऴुंगे बालेवाडीच्या क्रीडासंकुलात होणार आहे. राज्यकुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाऴासाहेब लांडगे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. किताबी लढतीसह मॅट आणि गादीवरील प्रत्येकी 10 अशा एकंदर 20 गटांत स्पर्धा घेतल्या जातील. राज्यभरातील साडेनऊशे मल्ल स्पर्धेंत सहभागी होतील.
स्पर्धेची माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत स्पर्धेच्या नवीन लोगोचं अनावरण करण्यात आलं. तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने अमनोरा टाऊनशिपचे विकासक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत ५ वर्षांसाठी करार केला आहे. याअंतर्गत स्पर्धेचे आयोजन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, स्पर्धेचा स्तर विविध पातळीवर उंचवावा आणि मल्लांसोबतच प्रेक्षकांचाही फायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचंही सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याला तब्बल १२ वेळा या स्पर्धेचं आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. २०१७ मध्ये पुण्यातील भुगाव येथे महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके विजयी झाला होता. भूगावच्या कुस्ती आखाड्यात मॅटवर अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला धूळ चारत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली होती.
दरम्यान, ६२ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जालना येथे पार पडली होती. या स्पर्धेत बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता. बालानं किताबासाठीच्या लढतील गतविजेत्या पुणे शहरच्या अभिजीत कटकेचा 11-3 असा पराभव केला. या विजयासह बाला रफिकनं पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली होती.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206836421576642560?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206836402190610432?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

