मुंबई : कोरोना विषाणुमूळे देश मोठ्या संकटात असताना आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत.आरोग्य विभागाला कर्मचार्यांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे. गेली अनेक वर्षे आरोग्य विभागाची पंद रिक्त आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहे. ‘ आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतीलअशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसापूर्वी एका ज्येष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हंगामी आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील याच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजावत आहेत. राज्यात आरोग्य खात्याची तब्बल ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, १०,६६८ उपकेंद्रे आहेत.
तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व सहाय्यकांची तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याचेदेखील यावेळी या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
