टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु झाला आहे. पण देशभरात मरगळ आलेल्या कॉंग्रेस पक्षात नवसंजीवनी भरण्याचे सोडून कॉंग्रेसचे दिग्गज नेते हे परदेश वारीला निघाल्याची माहिती मिळत आहे. राहुल गांधी यांनी दोन्ही राज्यातील तिकीट वाटप प्रक्रियेत सुद्धा सहभाग घेतला नव्हता. दरम्यान, कॉंग्रेस पक्षात राहुल गांधी यांचाव्र पक्षाची कोणतीही महत्वाची जबाबदारी नसल्याने ते आपया वायनाड या मतदारसंघात लक्ष देत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी मैडिटेशन करण्यासाठी बँकॉकला गेले होते. मात्र त्यानंतर राहुल गांधी आणखी दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे दोन राज्यात विधानसभा निवडणुका होत असताना कॉंग्रेस पक्षाचा प्रमुख नेताच देशात नसल्याने कार्यकर्ते कमालीचे नाराज असल्याचे दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा जरी नैतिकतेच्या आधारावर दिल्याचे बोलले जात असल तरी या राजीनाम्यामागे पक्षातील सिनियर नेत्यांवरील नाराजी हेच मुख्य कारण असल्याचे समजत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अध्यक्ष राहुल गांधी हेही सक्रीय होणार असल्याचे बोलले जात होते. राहुल गांधी हे गांधी जयंतीच्या निमित्ताने काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार होते. राहुल गांधी देखील यामध्ये सहभागी होणार असून ते वर्ध्यात पदयात्रा करणार असल्याची महिती होती. पण अहुल गांधी निवडणुकीत पक्षाला वाऱ्यावर सोडत परदेशात जाणं पसंद केल्याने कॉंग्रेस नेते कमालीचे संभ्रमात आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1180717813196972032?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180717442365935616?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180709152483508224?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

