टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व उद्योग आणि व्यावसाय बंद आहेत. या बंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे तो रोजंदारी आणि हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाला. यातील बहुतांश कामगारवर्ग हा बांधकाम क्षेत्रात काम करतो.
आता याच घटकाला दिलासा देण्यासाठी राज्यसरकार नोंदणीकृत बांधकाम मजुरांना २००० रुपये देणार आहेत . ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालय आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट –
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री यांच्या बैठकीत मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना ₹ २००० एवढे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री यांच्या बैठकीत मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना ₹ २००० एवढे आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. https://t.co/XlhrX6MPLg
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 18, 2020
बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार. राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक कामगारांना होणार लाभ- कामगार मंत्री @Dwalsepatil pic.twitter.com/TsXeVbZ4pP
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 18, 2020
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली माहिती –
या निर्णयाबद्दलची माहित कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरून दिली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य. करोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे.
लॉकडाऊनचा कालावधी दि. 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना रु.2000/- एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रु.2000/- प्रमाणे आर्थिक मदत राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त आर्थिक सहाय्य नोंदीत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला (BOCW) देण्यात आले आहेत.
करोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनचा कालावधी दि. 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झालेली आहेत.
2/7— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 18, 2020
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना रु.2000/- एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक 4/7
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 18, 2020
मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी रु.2000/- प्रमाणे आर्थिक मदत राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त आर्थिक सहाय्य नोंदीत 6/7
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 18, 2020
@PawarSpeaks @uddhavthackeray @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AnilDeshmukhNCP @supriya_sule @NCPspeaks
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 18, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

