Share

सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) योगदानासाठी महाराष्ट्र सरकारकडून स्वतंत्र बँक खातं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच संकट गहीरं होत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लॉक डाऊन  करण्यात आल्याने त्याचा विपरीत परिणाम सरकारच्या आर्थिक उत्पन्न स्रोतांवर झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून ज्या लोकांची सरकारच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान द्यायचं आहे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्याव असं आवाहन करण्यात आलं होतं.

परंतु केंद्र सरकारने एकीकडे केंद्र सरकारच्या  PM – CARES मध्ये मदत जमा केल्यास सामाजिक दायित्व निधी म्हणून ग्राह्य धरले जाईल असे म्हटले. परंतु दुसरीकडे मुख्यमंत्री सहायता निधीत मदत जमा केल्यास रक्कम ही व्यावसायिकांनी सामाजिक दायित्व निधीमधून योगदान दिले यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही असं स्पष्ट केलं होत. त्यावरून काही काळ राजकारणही तापलं होतं. 

आता हाच प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने  ‘महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ या नावाने स्वतंत्र बँक खात उघडले असून उद्योजक, व्यावसायिक त्यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून येथे योगदान देऊ शकतात. याबाबतची माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने ट्वीटरवरून दिली आहे.

‘ #coronavirus च्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना पाठबळ आवश्यक. ‘महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ या नावाने उघडलेल्या स्वतंत्र बँक खात्यात उद्योजक, व्यावसायिकांनी सामाजिक दायित्व निधीमधून योगदान द्यावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन’

खात्याचा तपशील 

खात्याचे नाव :- महाराष्ट्र स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी

बँक खाते क्रमांक :- ३९२६५५७८८६६

बँकेचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई .

ब्रँच कोड :- ५७२

आयएफएससी (IFSC) :- SBIN००००५७२

एमआयसीआर (MICR):- ४००००२०८७

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!