Share

वाढ रे रस्सा : चिकनमुळे कोरोनाची लागण होत नाही,सरकारकडून चिकन फेस्टिव्हलचे आयोजन

Published On: 

मुंबई : संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोना व्हायरस ने हाहाकार माजवलेला आहे. मागच्या महिन्यापर्यंत केवळ चीन या देशापुरता मर्यादित असलेला विषाणू सध्या जगभरातील जवळपास ८१ देशांमध्ये पोहचला आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून हा विषाणू भारतामध्ये देखील पसरायला लागलेला आहे.

हा विषाणू जास्त न पसरवा म्हणून सगळेच लोक आप-आपल्या पद्धतीने योग्य ती काळजी घेत आहेत. परंतु ज्या प्रमाणे हा कोरोना व्हायरस जगभर पसरला आहे त्याच पद्धतीने व्हायरससोबत अफवाही मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. नॉनव्हेज किवा प्रामुख्याने चिकन खाल्यामुळे याची लागण होते अशा प्रकरची अफवा सध्या मोठ्या प्रमाणात पसरत आहे.

चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होत नाही हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. मात्र, तरीही चिकन खाल्ल्याने कोरोना या जीवघेण्या रोगाची लागण होते, अशी अफवा राज्यात जोरदार पसरली आहे. त्यामुळे लोकांनी चिकन खाणे कमी अथवा बंद केले आहे. याचा परिणाम राज्यातील पोल्ट्री उद्योगावर झाला आहे. अनेकांनी स्वयंरोजगाराकडे वळत पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला आहे.

दरम्यान,चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लवकरच चिकन फेस्टिव्हलचं आयोजन केले जाणार आहे. नागपूर आणि मुंबईत चिकन फेस्टिव्हल भरवला जाणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!