Share

राज्यांच्या कर वाट्यातील ४६०३८.७० कोटी रुपयांपैकी महाराष्ट्रासाठी अवघे २८२४.४७ कोटी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. आर्थिक व्यवहार थांबल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन्ही सरकारांना आर्थिक चणचण भासू लागली आहे.

राज्य सरकारकडून केंद्र सरकारने करांमधील राज्यांचा वाटा आणि मागील थकबाकी त्वरित द्यावी अशी मागणी सातत्याने लाऊन धरली होती. आता त्यांच दृष्टीने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून राज्यांना १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांच्या करांमधील वाट्यातील एप्रिल महिन्यातील रक्कम अदा करण्यास मंजुरी दीली आहे.

यात एकूण ४६०३८.७० कोटी रुपयांपैकी महाराष्ट्रासाठी अवघे २८२४.४७ कोटी इतकी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे एकूण कर संकलनात सर्वाधिक वाटा देणाऱ्या महाराष्ट्राला वित्त आयोगाच्या कर वाटणी सूत्राचा फटका बसला आहे.

याबद्दलची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ट्वीटरवरून दिली आहे. केंद्रीय करांमधील एप्रिलच्या हप्त्यासाठी राज्यांचा वाटा असणारी ४६०३८.७० करोड इतकी रक्कम राज्यांना वतरित करण्यास अर्थ मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. हे रक्कम १५व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वाटण्यात आली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!