Share

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या ‘त्या’ दुष्काळी गावासाठी अखेर मनसेच आली धावून

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत दुष्काळ आणि बेरोजगारी या दोन महत्त्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या गावाची नाशिकच्या सभेत राज यांनी पोलखोल केली होती. दुष्काळाचे वास्तव दाखवणाऱ्या या गावाच्या मदतीला मनसे धावून गेली आहे.

नाशिकच्या सभेत राज यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्डेवाडी या गावाचे वास्तव दाखवले. या गावातील दुष्काळ निवारणासाठी मनसे सरसावली आहे. या गावाला पाण्याच्या टाक्या आणि टँकर पुरवण्यात येणार आहेत. मनसे नेते मनोज चव्हाणांच्या पुढाकाराने या गावाला १ मे पासून ते पाऊस पडेपर्यंत २००० ली. पाण्याच्या टाक्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे मनसे अधिकृतच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आले आहे.

बर्डेवाडी गावातील महिला या हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहीरीतून पाणी काढत असतानाचा व्हीडिओ राज यांनी नाशिकच्या सभेत दाखवला होता. तसेच या गावातील, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करत राज यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकाही केली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!