पटना : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं वातावरण चांगलंच तापलं होतं. बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा देण्याआधी या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर टीका केली होती.
यानंतर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होत. तर, गुप्तेश्वर पांडेंनी आपल्या पदाचा राजीनामा देत जेडीयू पक्षात प्रवेश केला. ते बिहार विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. शिवसेनेचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांनी सुशांत प्रक्ररणात महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा वचपा काढण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचं सांगितलं होतं. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं देखील ते म्हणाले होते.
मात्र आता शिवसेनेचा हा बदल्याचा सामना मात्र आता पूर्ण होऊ शकणार नाही. काल जेडीयू पक्षाने आपल्या कोट्यातील सर्व 115 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या यादीमध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. बक्सरची जागा युतीमध्ये भाजपच्या खात्यात गेली असून भाजपकडून या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली आहे. यानंतर निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
एक होता DGP!
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 8, 2020
बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे बक्सर येथून विधानसभा निवडणूक लढण्यास तयार होते. पण त्यांना संयुक्त जनता दलात (जेडीयू) आणि भाजप यांच्याकडून तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे पांडे हे नाराज आहेत. अशातच महाराष्ट्र काँग्रेस या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे ‘एक होता डिजीपी’ म्हणत काँग्रेस पक्षाने गुप्तेश्वर पांडेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर
- ‘सेनेचे स्टार कॅम्पेनर्स बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार’
- शाहू महाराजांनी आरक्षण दिले, मग आता मराठा समाजाला आरक्षणामधून बाहेर का फेकले जात आहे?
- 25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट
- गुप्तेश्वर पांडेंचा झाला गेम : शुभचिंतकांना म्हणाले, ‘मला फोन करू नका,त्रस्त झालो आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

