टीम महाराष्ट्र देशा- दसऱ्याच्या मुहूर्तावर काल राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. भाजपानं बीड जिल्ह्यातील दसरा मेळाव्यातून प्रचाराला प्रारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाची स्थापना केली या आधीच्या सरकारांना 70 वर्षात हे काम करता आलं नाही असं भाजपा अध्यक्ष अमित शहा या मेळाव्यात म्हणाले.
शिवसेनेच्या मुंबईतील शिवाजीपार्क मैदानावरच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा रामराग आळवला. यंदा विजयादशमी दोनदा साजरी करू आजही आणि 24 तारखेलाही असं सांगून त्यांनी युतीच्या विजयाची हमी देत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली, शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासनही ठाकरे यांनी दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं प्रचारसभा झाली. आमचं सरकार सत्तेवर आल्यावर शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असं पवार यावेळी म्हणाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळी असली तरी भविष्यात काँग्रेस एक व्हायला हवी असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात व्यक्त केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

