Share

अवघ्या काही तासातचं महादेव जानकर थंड, मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काल रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये बारामती मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर याचं तिकीट कापून भाजपने दौंडचे आ. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे नाराज होऊन रासपचे महादेव जानकर यांनी युतीतून बाहेर पडण्याचे बंड पुकारले होते. मात्र जानकारांनी पुकारलेला हा बंड अवघ्या २ तासातच मुख्यमंत्र्यांनी मोडून काढला.

आज संध्यकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटकपक्षांची मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर यांच्यासह इतर नेते हजर होते. फडणवीस यांनी सर्व घटकापक्षांची चांगलीच समजूत काढली असल्याचं दिसत आहे. कारण या बैठकी नंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत आक्रमक पवित्रा घेत युतीतून बाहेर पडण्याचा बंड पुकारणारे महादेव जानकर थंडावले आहेत. जानकरांनी युतीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान या बैठकीत एनडीए समवेत पक्षीय पातळींवर चर्चा झाली. एनडीए सरकार पुन्हा येण्यासाठी काय करता येईल याची चर्चा झाली. घटक पक्षांना सोबत घेऊन काम करू असं आश्वसान मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, अशी माहिती जानकरांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!