टीम महाराष्ट्र देशा : माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे ओबीसींचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी काँग्रेससोबत यावं, अशी खुली ऑफर काँग्रेसचे नेते हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांनी जानकरांना दिली आहे. माजी आमदार नारायण मुंडे यांचा ७५ व्या अमृत महोत्सव सोहळा आणि सामाजिक न्याय मेळावा घेण्यात आला होता. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दोदडगाव येथील संत ज्ञानेश्वर कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा मेळावा पार पडला. यावेळी राजीव सातव यांनी हे वक्तव्य केलं.
सातव म्हणाले की ,आताच जानकरांचे भाषण झालं. त्यांना मंत्री व्हायच्या आधी, मंत्री असताना आणि सरकार बदलल्यानंतर अशा तिन्ही वेगवेगळ्या रुपात आणि भूमिकेत आपण त्यांना पाहिलं आहे. जानकरांवर आमचे १०० टक्के प्रेम आहे. त्यावर काहीही दुमत नाही. ते मेहनत करणारे कष्ट करणारा नेते आहेत.
सातव आता तुमचं सरकार आहे. तुम्ही याकडे लक्ष दिलं पाहिजे आता काय मी मंत्री नाही, असे मघाशी जानकर म्हणाले. मात्र जानकरांसारखे ताकदीचे नेते आणि कार्यकर्ते सोबत यावं असं कोणाला वाटत नाही. त्यामुळे आमची खुली ऑफर आहे. तुम्ही कधीही विचार करा,” असंही राजीव सातव यांनी यावेळी स्पष्ट केलं.
कष्ट करणारा एखाद्या मागण्याला घेऊन काम करणार जानकरांचे नेतृत्व आहे. त्यामुळे जानकरांवर आमचं बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं. त्यामुळे आता मी खुली ऑफर देतो. आता ते काय विचार करतात तो पुढचा विषय आहे, असेही सातव यांनी पुढे सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

