Share

मध्यप्रदेश म्हणजे ‘महाराष्ट्र’ गमावण्याची भरपाई आणि ‘बिहार’ जाण्याच्या शक्यतेसाठी विमा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर राजकीय संकट ओढावल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान,ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडाली होती.सिंधिया यांनी काल पंतप्रधानांची भेट घेतली.ज्योतिरादित्य सिंधिया खरेच भारतीय जनता पक्षात गेले तर त्यांना भाजप कोणती जबाबदारी देईल यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. भारतीय जनता पक्ष कदाचित सिधिंया यांना राज्यसभेवर पाठवू शकतो असे म्हटले जाऊ लागले आहे.

मंगळवारी मध्य प्रदेशातील विरोधी पक्ष भाजपनं आपल्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावलीय. सायंकाळी ६.०० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपनं आपल्या सर्व अर्थात १०७ आमदारांना निरोप धाडलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराजसिंह चौहान यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड होऊ शकते.

काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट सिंधिया यांच्याबरोबर आहे. काँग्रेसचे २४ आमदार राजीनामा देणार असल्याची माहितीही मिळत आहे. काँग्रेसचे काही आमदार कर्नाटकमध्ये असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दुसऱ्या बाजूला कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा सादर केला आहे. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्चनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिले आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर कमलनाथ आपला दिल्ली दौरा अर्ध्यावर सोडून भोपाळला रवाना झाले होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वातील 17 आमदारांच्या गटाशी संपर्क होत नव्हता. रात्री दहाच्या सुमारास कमलनाथ यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. त्यावेळी 20 मंत्र्यांनी आपले राजीनामे कमलनाथांकडे सोपवले.

मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. यांपैकी २ आमदारांचे निधन झाले आहे. अशा प्रकारे विधानसभेची सध्याची सदस्यसंख्या आहे २२८ इतकी. काँग्रेसकडे एकूण ११४ आमदार आहेत. तर सरकार बनवण्याचा जादुई आकडा ११५ इतकी आहे. काँग्रेसला ४ अपक्ष, २ बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदाराचे संमर्थन आहे. अशा प्रकारे काँग्रेसकडे एकूण १२१ इतके बळ आहे. तर, भारतीय जनता पक्षाकडे १०७ आमदार आहेत.

राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांची टिप्पणी –

मध्यप्रदेशमधील घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर अनेक राजकीय विश्लेषकांनी भाष्य केले आहे. राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी या सर्व घडामोडींवर महत्वाची टिप्पणी केली आहे. आपल्या ट्वीटरवर ते लिहतात,

कॉंग्रेसमधील विभाजन आणि तुकडे होणे पूर्णपणे अनपेक्षित नाही. परंतु या सोडून जाणाऱ्यांकडे स्वत:हून उभे राहून किंवा उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्याचीही समर्थता नाही. त्यांची खरी शक्तीहीनता आणि भाजपाच्या वर्चस्ववादी शक्तीने विरोधी पक्षाच्या राजकारणाला जागा सोडली नाही.

प्रत्येकजण कॉंग्रेसच्या नेतृत्वाच्या चुकांबद्दल बोलत असताना हे मनोरंजक नाही काः आसाम ते महाराष्ट्र ते मध्यप्रदेश या राज्यात सोडून जाणऱ्या कॉंग्रेस नेत्यांना विचारसरणीच्या प्रश्नांबाबत काही देणं घेणं नाही. तर, कॉंग्रेसची साफ सफाई चालूच राहील. पण पक्षात कुणी शिल्लक राहील का?

 

१९९८ : सोनिया गांधी अनेक नेत्यांनी आणि गटाच्या कॉंग्रेस सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष झाल्या. २०२०: आता त्या पक्ष विखुरण्याच्या नव्या लाटेला सुरवात झाल्याच्या  पक्षाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षस्थानी आहेत. फरक एवढाच : तेव्हा स्थानिक राज्यास्थरीय पक्ष स्थापन झाले; यावेळी बहुतेक जण भाजपमध्ये विलीनीकरण झाले आहेत.

‘आपण असे म्हणू शकतो का मध्यप्रदेश म्हणजे महाराष्ट्र गमावण्याची भरपाई आणि बिहारमध्ये महाराष्ट्रसारख्या घडामोडी होण्याची शक्यतेसाठी विमा ?’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!