Share

माधव देवचके बनला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात ह्या आठवड्यात अभिनेता माधव देवचके घराचा कॅप्टन बनला आहे. बिग बॉसने दिलेल्या सहनशक्ती टास्कमध्ये आपल्या खिलाडुवृत्तीने तो जिंकला आणि कॅप्टन बनला.

बिग बॉसच्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. ह्या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ह्या कार्यात जास्त वेळ उभे राहून माधव जिंकला. आणि त्याला कॅप्टनपद मिळाले.

माधव देवचकेच्या जवळच्या सूत्रांच्या अनुसार, बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या आठवड्यात झालेल्या तणावमय वातावरणानंतर आता घराला सर्वांचे समजून घेणारा आणि सर्वांशी जुळवून घेणारा कॅप्टन हवा होता. आणि माधवच्या कॅप्टन बनण्याने घरातले वातावरण शांत राहण्यास नक्कीच मदत होईल.

ह्या आठवड्यातल्या ‘विकेन्डच्या वार’ला महेश मांजरेकरांनीही माधवच्या शांत स्वभावाचीच स्तूती केली होती. महेश मांजरेकर म्हणाले होते, ही डोन्ट हॅव एनी बॅड ब्लड इन दि बॉडी, माधव खूप भोळा आहे . तो कोणालाच वाईट बोलत नाही. कोणालाच दुखवत नाही. हे खरं तर ह्या गेममध्ये करून चालत नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!