🕒 1 min read
इंदौर : कोरोनामुळे देश लॉक डाऊन असल्याने क्रिकेटर हे सध्या घरी आहेत. आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. हाच मोकळा वेळ भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीच्या देखील वाट्याला आला आहे. तर धोनी हा वेळ आपल्या कुटुंबा बरोबर घालवत आहे. खासकरुन त्याची मुलगी झिवा हिला धोनी जास्त वेळ देत आहे.
असाच या बाप-लेकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी आणि मुलगी झिवा एकत्र बाईक राईड करत आहे. धोनी आपल्या इंदौरच्या फार्म हाऊसवर वेळ घालवत आहे, तर बंगल्याच्या गार्डनमध्ये तो आपल्या मुलीसोबत बाईक चालवण्याची मजा घेत आहे. हा व्हिडीओ चेन्नई सुपर किंगच्या ट्विटर अकाउंट वरून व्हायरल करण्यात आला आहे.
Thala Suthifying, literally! ???????????? #WhistlePodu VC: @SaakshiSRawat pic.twitter.com/0xpOxVoVET
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 20, 2020
वर्ल्डकप 2019च्या सेमीफायनलनंतर क्रिकेतपासून लांब गेलेला एम एस धोनी हा IPLच्या माध्यमातून आपल्या नव्या अंदाजात दिसणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे त्यावर देखील पाणी पडले आहे. कोरोनामुळे IPLही रद्द होण्याच्या मार्गावर आहे.


