🕒 1 min read
जालना : जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील एका प्रेमाच्या दुसऱ्या गोष्टीची सध्या भलतीच चर्चा होत आहे. आईवडिलांनी बळजबरीने लग्न लावून दिलेल्या एका तरुणीने शेवटी नवऱ्याच्याच मदतीने आपल्या प्रियकरासोबत लग्न करत संसार थाटल्याच्या या फिल्मी कहाणीवर सध्या तालुक्यात बरीच चर्चा रंगतांना दिसत आहे.
गतवर्षी पासून कोरोना विषाणूमुळे सर्वत्र साध्या पद्धतीने लग्न समारंभ होत आहेत. अगदीच तामझाम न करता चार लोकांमध्ये विवाह सोहळा आटोपून घेण्यात पालक समाधान मानत आहेत. तर वराकडील मंडळीही आपल्या आशाअपेक्षांवर मुरड घालत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी मुलीच्या पाल्यांकडून बळजबरीने विवाह लावून देण्यासारखे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार जालना जिल्ह्यात घडला मात्र या प्रकरणात पुढे जाऊन आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळाला.
जालना जिल्ह्यातील परतूर येथील मुलीचे लग्न वाढोणा येथील मुलाशी ठरवण्यात आले. या मुलीचे आधीपासूनच दुसऱ्या मुलावर प्रेम होते. मात्र आईवडिलांनी बळजबरीने या विवाहाचा घाट घातला. मात्र लग्न झाल्यानंतर महिनाभरातच नवविववाहितेने विहिरीत उडी मारत असल्याचा बेबनाव केला. प्रकरण थेट पोलीसांपर्यंत गेले. त्यानंतर मात्र घाबरलेल्या सासरच्या मंडळींनी आणि माहेरच्या मंडळींनीही प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचे वचन दिले. सध्या संपूर्ण गावात या लग्नाची आणि अजब प्रेमाची जोरदार चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लस न घेताच मिळाले लसीकरणाचे प्रमाणपत्र, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना
- प्रशासनाचे दुर्लक्ष! गोदावरी घाटातून दिवस-रात्र वाळु उपसा सुरू
- जेलमध्ये कोरोनाचा हाहाकार ; कैद्यांना पेरोलवर सोडा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
- दगडफेक करत जिल्हा बँकेच्या वडनेर शाखेचे १० लाख लुटले
- ‘२.६ कोटी लसीचे डोस द्या, ३ महिन्यात संपूर्ण दिल्लीचं लसीकरण पूर्ण करून दाखवतो’

