भोपाळ : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
दरम्यान, लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.
भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. तर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे.
'Love-Jihad' & religious conversions are being funded. They give targets saying we'll give money to marry Hindu girls. There should be a detailed probe by Home Ministry into such funding & action should be taken against culprits: MP Minister Arvind Bhadoria on 'Love-Jihad' pic.twitter.com/txP3hHn5Au
— ANI (@ANI) November 26, 2020
यादरम्यान, शिवराज सरकारमधील मंत्र्याने मोठं विधान केले आहे. मंत्री अरविंद भदौरिया यांनी सांगितले की, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण करण्यासाठी फंडिग होत आहे. ते लोक हिंदू मुलींसोबत लग्न करण्यासाठी पैसे दिले जात आहेत. गृह मंत्रालयाने अशाप्रकारच्या फंडिगची सविस्तर चौकशी करावी आणि त्यातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना आता ‘हे’ करणे अनिवार्य असेल
- धक्कादायक : कोरोनाच्या नवीन रुग्णांपैकी 61% रुग्णसंख्या ‘या’ सहा राज्यांमधून
- ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार
- ‘कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरुन येणार नाही’ : उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

