पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे आज करोनामुळे निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ताकाका साने यांच्यानंतर धडाडीची तोफ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जावेद शेख यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादीला पंधरा दिवसांत हा दुसरा मोठा झटका बसला आहे. जावेद शेख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक असलेल्या जावेद शेख यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 21 जुलैपासून त्यांची तब्येत जास्त खालवल्याने त्यांच्या प्लाज्मा थेरपीचाही वापर करण्यात आला होता. मात्र निमोनियाही झाल्याने ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. यानंतर त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. सातत्याने खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती.
जावेद शेख यांच्या लढवय्या वृत्तीमुळे ते करोनावर मात करतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांची करोनाविरोधातील लढाई आज (शुक्रवारी) पाचच्या सुमारास संपुष्टात आली. त्यांना पाच वाजता मृत घोषित करण्यात आले. जावेद शेख यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनानं सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावला आहे. सामाजिक क्षेत्रात व महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/30VmDKwj5C
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 31, 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावला आहे. संघटनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या या झुंजार सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. आकुर्डी गावठाण भागातून त्यांनी महानगरपालिकेचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात कायम आवाज उठविला. सामाजिक क्षेत्रातील तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
‘अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

