Share

वूमन पॉवर’चा नादखुळा नगरी पॅटर्न, पुरुषांना बाजूला सारत महिलांनी पार पाडला विवाह सोहळा

Published On: 

अहमदनगर : विवाह सोहळ्यातील पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत अहमदनगर जिल्ह्यात एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. तसेच या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचा वूमन पॉवर’चा नादखुळा नगरी पॅटर्न चर्चेचा विषय बनला आहे.

लोणी प्रवरानगर येथील म्हस्के कुटुंबातील संचिता आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी गावातील गायकवाड कुटुंबातील अनिकेत यांचा विवाह गुरूवारी संध्याकाळी पार पडला. आणि या विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी महिलांनी उचलली. यामुळे व्हराडी मंडळींच्या देखील भुवया उंचावल्या.

याचप्रमाणे लोणी प्रवरानगर इथल्या या विवाह सोहळ्यात विवाहाची सर्व जबाबदारी महिलांनी उचलली. या लग्नाची सर्व जबाबदारी महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली. तसेच विवाहात सर्व मान महिलांना मिळायला हवा असे दोन्ही कुटुंबांनी ठरवले होते. त्यामुळे लग्न पत्रिकेतही आधी महिलांची नावे होती. त्यानंतर पुरुषांची नावे होती.

दरम्यान, पाहुण्यांच्या स्वागतापासून ते अंतरपाट, निवेदन आणि पौराहित्यही महिलांनीच केलं. नवरा आणि नवरीच्या मागे उभं राहणाऱ्या मामाची जागाही मामीनं घेतली. पंचक्रोशीत सर्वत्र या अनोख्या वूमन पॉवर ची चर्चा आहे. या विवाह सोहळ्यातून सामाजिक संदेश देण्यात आला. समाजात पुरुष व महिला समानता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न यातून केला आहे, असे सांगण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!