टीम महाराष्ट्र देशा : ‘काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला फटका बसला आहे.’ असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल सुरू आहे. दरम्यान, महायुती ४४ तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी ३ जागांवर आघाडीवर तर वंचित बहुजन आघाडी १ जागेवर आघाडीवर आहे. याचदरम्यान कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत वादावरून टीका केली आहे. महायुतीच्या आघाडीवर असलेल्या जागांचा निकाल पाहता काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला फटका बसला आहे.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्यात तर राज्यात भजपा २४, शिवसेना २०, कॉंग्रेस ० तर राष्ट्रवादी ४ आणि वंचित १ जागांवर आघाडीवर आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

