Share

पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये भूकंप, राज्यातील दिग्गज नेत्यांचा राजीनामा सत्र सुरु

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यात कॉंग्रेसचा आश्चर्यकारक पराभव झाल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे समोर आले आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबत राज्यातील कॉंग्रेसचे अनेक देग्गाज नेते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे माहिती आली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव करत कॉंग्रेस आघाद्दी विजय मिळवणार असे अनेक वक्तव्य कॉंग्रेच्या नेत्यांनी केले होते. परंतु निकालादरम्यान तसे काही झाले नाही. राज्यात ४१ जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर ६ जागांवर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आघाडीवर आहे.

राज्यात भाजपा २३, शिवसेना १८, कॉंग्रेस १, राष्ट्रावादी ५ तर वंचित १ जागांवर आघाडीवर आहे.

विशेष म्हणजे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यांचाही भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ५० हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारत ते राजीनामा देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!