टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
सतारा मतदारसंघाच्या निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. मतमोजणीला सुरवात होताच सतारा लोकसभा मतदारसंघाचा कल आला आहे. सतारा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. सतारा या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांना उतरवण्यात आले होते.
सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस २०१४ मधील आपल्या कामगिरीत सुधारणा करणार? हे आज मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
११ एप्रिल ते १९ मे दरम्यान लोकसभेच्या ५४२ जागांच्या मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले होते. ही निवडणूक सात टप्प्यात पार पडली. या सात टप्प्यात ९०.९९ कोटी मतदारांपैकी जवळपास ६७.११ टक्के मतदारांनी आपल्या मताचा वापर केला. देशात लोकसभा निवडणुकीसाठी झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

