टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर आहेत. तसेच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा लाजीरवाणा पराभव होताना दिसत आहे. तर वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी सहज विजय मिळवला आहे. जवळजवळ दीड लाखांच्या मताधिक्यानी तडस यांनी विजय मिळवला आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघातून भाजपकडून रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांना शह देण्यासाठी कॉंग्रेसकडून चारुलता टोकास या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अखेर वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने रामदास तडस यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिली आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार रामदास तडस यांना ४६१४५१ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार चारुलता टोकास यांना ३०३३५६ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत रामदास तडस यांनी १५८०९५ मतांनी बाजी मारली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
