Share

आकोल्यात भाजपचे उमेदवार संजय धोत्रेंचा विजय जवळपास निश्चित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अशीच प्रतिष्ठा प्रकाश आंबेडकर यांची देखील पणाला लागली होती. पण सोलापूर पाठोपाठ आकोल्यात देखील प्रकाश आंबेडकर यांना पराभव सहन करावा लागणार आहे. कारण आता आलेल्या निकालांनुसार आकोल्यातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय धोत्रे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

आकोला लोकसभा मतदार संघातून भाजपकडून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांना शह देण्यासाठी वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे खुद्द निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तसेच कॉंग्रेस आघाडीकडून हिदयातुलाह पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर आकोला लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने संजय जाधव यांच्या हातात प्रतिनिधित्वाची धुरा दिल्याच दिसत आहे.

आकोला लोकसभा मतदारसंघाच्या या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये आता आलेल्या निकालांनुसार विजयी उमेदवार संजय धोत्रे यांना ५३९७९९ एवढी मत मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना २७२७७१ एवढी मत मिळाली आहेत. या झालेल्या एकतर्फी लढाईत प्रकाश आंबेडकर यांनी २६७०२८ मतांनी बाजी मारली आहे, असे म्हणता येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!